मुकेश अंबानी म्हणतात, मुंबई सर्वांचीच!
लंडन
मुंबईत टॅक्सी परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्देवी असल्याचे सांगून 'मुंबई ही सर्वांचीच आहे,' असे मत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेतील खासदार एन. के. सिंग यांच्या 'नॉट बाय रिझन अलोन- द पॉलिटिक्स ऑफ चेंज' या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. आपण सर्व सर्वांत आधी भारतीय आहोत. मुंबई, चेन्नई, दिल्ली सर्व भारतीयांची आहे. हेच वास्तव आहे, असे सांगून ते म्हणाले, आर्थिक उदारीकरणानंतर भारतातील कॉर्पोरेट जगत परवाना राज संस्कृतीपासून दूर गेले, पण मुंबईतील गरीब टॅक्सीवाला मात्र परवाना राज संस्कृतीतच अडकला आहे. अंबानींच्या या वाक्यानंतर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की भारतापुढे सर्वांत मोठे आव्हान हे आहे की आपण प्रत्येक वर्षी १५ ते वीस दशलक्ष नव्या नोकर्या कशा निर्माण करणार? त्यामुळे येत्या काही वर्षांत रोजगार उपलब्ध करणे हे मोठे आव्हान असणार आहे.
No Response to "मुकेश अंबानी म्हणतात, मुंबई सर्वांचीच!"
Post a Comment