'पाकने आपल्या मर्यादा सांभाळाव्यात'
नवी दिल्ली
पाकिस्तानकडून वारंवार सीमेवरील जवानांच्या दिशेने केल्या जाणा-या गोळीबाराबाबत सरकारने गंभीर दखल घेतली असून पाकने आपल्या मर्यादा सांभाळाव्यात आणि पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करू नये असा सज्जड दम दिला आहे. पाकचे उप उच्चायुक्त रिफात मसूद यांना या संदर्भात समन बजावून हे कृत्य पुन्हा घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पाकिस्तान) वाय.के. सिन्हा यांनी मसूद यांना या संदर्भात समन करून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात असल्याबद्दल एक पत्र सोपविले आहे.
मंत्रालयाचे प्रवक्ते विष्णू प्रकाश यांनी या संदर्भात सांगितले, की पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही कारणाविना वारंवार गोळीबार केला जात आहे. ही बाब गंभीर पाककडून वारंवार अशा घडना घडल्यास भारताची सहनशक्ती संपू शकते, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. या पत्रात 8 व 9 जानेवारी 2010 रोजी रात्री अमृतसर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर रॉकेट डागण्याच्या घटनेचाही उल्लेख आहे.
No Response to "'पाकने आपल्या मर्यादा सांभाळाव्यात'"
Post a Comment