लेफ्ट. जन.प्रकाश यांच्या कोर्टमार्शलचे आदेश

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील सुखना कॅंटोन्मेंट बोर्डात झालेल्या जमिन घोटाळ्यासंदर्भात लेफ्टनंट जनरल अवधेश प्रकाश यांचे कोर्ट मार्शल करण्याचे आदेश लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दीपक कपूर यांनी आज दिले. संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी यांनी दोन दिवसांपूर्वीच अवधेश कुमार यांचे कोर्ट मार्शल करावे असा सल्ला श्री. कपूर यांना दिला होता.
श्री. प्रकाश येत्या ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कारकिर्दीची अखेर दुर्देवी होत आहे. श्री. प्रकाश यांची खातेंतर्गत चौकशी करावी अशी शिफारस लष्करप्रमुख श्री. कपूर यांनी संरक्षणमंत्री एंटोनी यांना केली होती. मात्र, एंटोनी यांनी कोर्ट मार्शलचा सल्ला कपूर यांना दिला. श्री. प्रकाश हे श्री. कपूर यांच्या जवळचे मानले जातात.

श्री. प्रकाश यांनी लष्कराच्या मालकीची ७१ एकर चहा मळ्याची जमीन आपले कुटुंबिय व दिलीप अगरवाल यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात आली होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "लेफ्ट. जन.प्रकाश यांच्या कोर्टमार्शलचे आदेश"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner