हरिश्चंद्राची फॅक्टरीः कलाकृतीचा उत्कृष्‍ट चित्रपट

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

बॅनर- यूटीवी मोशन पिक्चर्स, पापरिका मीडिया आणि मयसभा प्रॉडक्शन
निर्माता- रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोडाई, परेश मोकाशी
दिग्दर्शक- 449px-harishchandrachi_factory2c_2009_film_posterपरेश मोकाशी
संगीत- आनंद मोडक
प्रॉडक्शन डिजाइनर- नीतिन चंद्रकांत देसाई
कलाकार- नंदू माधव, विभावरी, मोहित गोखले, अथर्व कर्वे


भारतामध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणार्‍या दादासाहेब फाळके यांचे जीवनचरित्र आजच्या तरुण पिढीसमोर आणण्याचे धाडस करणार्‍या रंगकर्मी परेश मोकाशीचे अभिनंदन करावे तेवढे थोड़ेच आहे. आज जगामध्ये सगळ्यात जास्त चित्रपटनिर्मिती करणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. परंतु, ज्या व्यक्तीने भारतात चित्रपटसृष्टीचे बीज रोवले त्याच्या चित्रपटांची रिळे अर्काइव्हकडे नाहीत किंवा फाळकेंसंदर्भात एखादे संग्रहालयही उभारले गेले नाही.

सरकार फक्त त्यांच्या नावाने पुरस्कार देते इतकेच.असे असताना फाळके यांनी कोणत्या परिस्थितीत पहिला चित्रपट तयार केला त्याची कथा प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे होते ते काम परेश मोकाशी यांनी केले आहे. दादासाहेबांचा पहिल्या चित्रपट निर्मितीचा आख्खा प्रवास त्यातील बlरकाव्यांसहित परेश यांनी पडद्यावर मांडला आहे. शिवाय असा चरित्रपट डॉक्युमेंटरी होण्याची शक्यता असतानाही त्याला एक नर्मविनोदी झालर दिल्याने त्यातले रंजकत्व जपले गेले आहे.

दादासाहब फाळकेंचा (नंदू माधव) प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असतो. शिवाय ते कुशल जादूगारही असतात. प्रेस बंद करून दूसरे काही तरी सुरू क रण्याची त्यांची धडपड असते. एक दिवस ते आपल्या मुलाबरोबर येशू ख्रिस्ताच्या जीवनावर तयार झालेला चित्रपट पहातात आणि चित्रपट निर्मितीचे भूत त्यांना पछाडते. कसलाही अनुभव, कोणाचीही ओळख नसताना ते लंडनला जातात आणि चित्रपटनिर्मितीचे तंत्र शिकून भारतात येतात. अगोदर ते उगवत्या झाडाचे चित्रिकरण करतात आणि लोकांना दाखवतात.

आपला पहिलाच चित्रपट ते राजा हरिश्चंद्राच्या जीवनावर तयार करण्याचे ठरवतात आणि तयारी सुरू करतात. या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना काय अडचणी येतात, काही जण कशी मदत करतात, नायिकेच्या शोधासाठी काय-काय करावे लागते. याकामी त्यांची पत्नी सरस्वती त्यांना कशी मदत करते, कॅमेरामॅन आणि अन्य तंत्रज्ञांना ते कसे शोधतात. आणि ते कसा आपला हा पहिला चित्रपट तयार करतात त्याची मनोरंजक कथा म्हणजे हा चित्रपट.मूळचा रंगकर्मी असलेल्या परेशने हे शिवधनुष्य पेलण्याचा जो प्रयत्न केला आहे तो उल्लेखनीय आहे. दादासाहेब फाळके यांचा चरित्रपट डॉक्युमेंट्री होऊ शकला असता, परंतु परेशने मनोरंजक पद्धतीने त्यांचा जीवनप्रवास पडद्यावर मांडलेला आहे.

छोट्या छोट्या प्रसंगामधून त्यांनी फाळके यांचा स्वभाव उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे. विनोदाच्या अंगाने गंभीर विषय त्यांनी मनाला रुचेल अशा पद्धतीनेच मांडला आहे. हे जीवन चरित्र पहाताना प्रेक्षक कंटाळू नये आणि त्याला पुढे काय होईल याची उत्सुकताही राहील याची काळजी त्याने चांगली घेतली आहे.

नंदू माधव याने दादासाहेब फाळके यांची भूमिका खूपच चांगल्या पद्धतीने साकारली आहे. असे वाटते की फाळके असेthumb2_harishc_751149च असावेत. विभावरीने फाळके यांची पत्नी सरस्वतीची भूमिकाही तितक्याच तोलामोलाने साकारली आहे. पतीच्या वेडेपणाला न हसता त्याला मदत करणारी व त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारी सरस्वती उल्लेखनीय आहे. त्याच प्रमाणे अथर्व कर्वे आणि मोहित गोखले या बाल कलाकारांनीही आपली भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.
सगळ्यात जास्त कौतुक करावे लागेल ते कला दिग्दर्शक नीतिन देसाई यांचे.

त्यांनी १९०० चा काळ खूपच चांगल्या पद्धतीने उभारला आहे. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती केली गेली असल्यामुळे चित्रपट खर्‍या कालावधीतील वाटतो. जुना काळ उभा करण्यात नीतिन देसाई यांचा हातखंडा आहे आणि तो त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे. यूटीवीचेही कौतुक करावे लागेल कारण त्यांनी या चित्रपटाला आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दाखवली त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.एकूणच अडचणींवर मात करीत यश कसे प्राप्त करावे ते हा चित्रपट शिकवते त्यामुळे सकारात्मक विचाराने भारावून जायचे असेल तर हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हरिश्चंद्राची फॅक्टरीः कलाकृतीचा उत्कृष्‍ट चित्रपट"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner