तेल व डाळींचे भाव वाढणार: शरद पवार

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली
भारताला पुढच्‍या 10 वर्षांपर्यंत खाद्य तेल आणि डाळींची आयात करावी लागणार असून आगामी काही दिवसात अन्‍नधान्‍याच्‍या दरात आणखी वाढ होण्‍याची शक्यता कृषीमंत्री शरद पवार यांनी व्‍यक्त केली आहे. गेल्‍या काही दिवसांपासून पवार भाव वाढीसंदर्भात उलटसुलट वक्तव्‍य करत असून त्यामुळे आधी साखर आणि नंतर दुधाचे भाव वाढले आहेत.

सीएनएन-आयबीएनशी बोलताना पवार यांनी सांगितले, की खाद्य तेलाच्‍या मागणीत सातत्याने वाढ होत असून समाजातील कमकुवत वर्गाचीही खरेदी क्षमताही वाढत आहे. जर आपण देशात 7 टक्के वाढीची अपेक्षा करत असू तर मागणीही वाढेल ही बाब निश्चित आहे. त्‍यामुळे अन्‍नधान्‍याच्‍या किंमती आणखी वाढू शकतात.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तेल व डाळींचे भाव वाढणार: शरद पवार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner