चिदंबरम पाकमध्ये जाणार!
Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणा-या सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या संमेलनासाठी गृहमंत्री पी. चिदंबरम पाकिस्तानात जाणार आहेत. ते या दौ-यावर गेल्यास मुंबई हल्ल्यानंतर पाकमध्ये जाणारे ते पहिले भारतीय मंत्री ठरणार आहेत. एका उच्चपदस्थ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मनमोहन सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस.एम. कृष्णा या संदर्भात चर्चा करणार असून जर
परराष्ट्र मंत्रालयाने यास परवानगी दिली तर गृहमंत्री संमेलनात सहभागी होण्यासाठी इस्लामाबादमध्ये जाणार आहेत.
सार्क देशांच्या गृहमंत्र्यांचे तीन दिवसीय संमेलन इस्लामाबादमध्ये 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "चिदंबरम पाकमध्ये जाणार!"
Post a Comment