'आऊट सोर्सिंग करणा-यांना सवलती नाहीत'
Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk
न्यूयॉर्क
विदेशांमध्ये नोक-यांची आउटसोर्सिंग करणा-या कंपन्यांना करांमध्ये दिल्या जाणा-या सवलती संपुष्टात आणणार आहे. तर त्या विपरीत घरगुती रोजगारास चालना देणा-या कंपन्यांना सवलती दिल्या जाणार असल्याचे सुतोवाच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहेत.अमेरिकन कॉंग्रेस समोर आपल्या पहिल्या संयुक्त भाषणात ओबामा म्हणाले, की एका अहवालानुसार 2015 पर्यंत आउटसोर्सिंगमुळे 33 लाख अमेरीकनांना नोकरी गमवावी लागणार आहे. मंदीमुळे नोकरी गमावणा-या लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे नोक-यांची आउटसोर्सिंग करणा-या कंपन्यांना मिळणा-या सवलती संपुष्टात येणार आहेत.
भारतात बीपीओ इंडस्ट्रीजला आउटसोर्सिंगमधून 71.7 अब्ज डॉलरची कमाई होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'आऊट सोर्सिंग करणा-यांना सवलती नाहीत'"
Post a Comment