मंदी ओसरल्‍यानंतर भारत महासत्ताः ओबामा

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टनBarak_837865155
भारत आणि चीनची अर्थव्यवस्था ज्‍या वेगाने सुधारत चालली आहे, ती पाहता आगामी काळात अमेरिका मागे पडू शकते. अशा स्थितीत मंदीतून बाहेर आल्‍यानंतर अमेरिकेला जगातील दुस-या क्रमांकाची महासत्ता म्हणून पाहणे आपल्‍याला शक्य होणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.
ओबामा म्हणाले, की आर्थिक सुधारणांचा विषय समोर आला की लोकांना वाट पहायला सांगितले, जाते. मात्र
भारत, चीन आणि जर्मनी सारखे देश मंदीतही शांतपणे प्रगती करीत आहेत. हे देश गणित आणि विज्ञानाला महत्‍व देत आपली अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. अशा स्थितीत भविष्‍यात मंदी ओसरल्‍यानंतर हे देश आर्थिक महासत्ता म्‍हणून समोर येऊ शकतात.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मंदी ओसरल्‍यानंतर भारत महासत्ताः ओबामा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner