अंबानींनी उद्योग करावा, राजकारण नकोः शिवसेना

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

मुंबईbalasaheb thackrey pR155
मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्रात केवळ उद्योग करावा राजकारण करू नये असा सल्‍ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असून मुंबई आणि महाराष्‍ट्र मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणसाचाच राहील असे स्‍पष्‍ट प्रतिपादन केले आहे. अंबानी यांनी मुंबईवर सर्व भारतीयांचा समान हक्क असल्‍याचे वक्तव्‍य दिले होते त्‍यावरून नवा वाद उभा राहिला आहे.
ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्‍या 'सामना'मध्‍ये म्हटले आहे, की मुंबई कुणाची या वादात यापूर्वी शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकरही पडले होते. गेल्‍या काही दिवसांपासून या संदर्भात बोलून प्रसिध्‍दी मिळवून घेण्‍याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. मात्र मुकेश अंबानी यांनी ही बाब ध्‍यानात घ्‍यावी की त्यांनी महाराष्‍ट्र आणि मुंबईत राहून उद्योग करून गडगंज संपत्ती कमवली आहे. त्यांनी ती करावी मात्र मराठी माणसाच्‍या वाटेत येऊ नये. 
 
लंडनमध्‍ये आयोजित एका कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी आपल्‍या भाषणात मुंबई सर्वांचित असल्‍याचे मत व्‍यक्त केले होते. त्यानंतर त्यांना मनसेने ताकीद दिली होती आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "अंबानींनी उद्योग करावा, राजकारण नकोः शिवसेना"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner