जोगवाः समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन
'आयड्रीम प्रॉडक्शन' निर्मित, संजय कृष्णाजी पाटील लिखित व राजीव पाटील दिग्दर्शित 'जोगवा' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवामध्ये आपली छाप सोडली असून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील रूढी परंपरा, जाती - वर्णावर बोट ठेवणारी सामाजिक विषमता अधोरेखित करणारा हा चित्रपट
आहे. नुकत्याच झालेल्या झी गौरव २००९ मध्ये तब्बल १२ नामंकनं मिळवून, सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनासह एकुण तीन पुरस्कार व संस्कृती क ला दर्पणची तब्बल १३ नामांकने मिळवण्याचे रेकॉर्ड केले आहे. पुणे चित्रपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अवार्डसह उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकही याच चित्रपटाने मिळविले आहे.
सावरखेड एक गाव, ब्लाईंड गेम, सनई चौघडे पासून ऑक्सीजन पर्यंत यशस्वी चित्रपट करणा-या राजीव पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जोगवाच्या रुपाने सामाजिक आशयाचा चित्रपट देण्याचं शिवधनुष्य त्याने उचलले आहे. डॉ. राजन गवस यांच्या चौंडकं, भंडारभोग या दोन कादंबर्या आणि चारुता सागर यांची दर्शन ही कथा अशा तीन साहित्यकृतीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आजच्या पिढीचे संगीतकार अजय व अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
संकलक राजेश राव यांनी चित्रपटाचे संकलन केले असून कार्यकारी निर्मिती आशिष भटनागर, विद्युत जैन यांची आहे. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम, अदिती देशपांडे, प्रिया र्बेडे, विनय आपटे, प्रमोद पवार, अमिता खोपकर, प्रशांत पाटील आणि चिन्मय मांडलेकर आदी कलाकारांचा सहभाग आहे.
कोल्हापुरसह गडहिंग्लज, सौंदत्ती, गोकाक अशा ऐतिहासीक आणि निसर्गसुंदर पार्श्वभु़मीवर चित्रीत झालेल्या 'जोगवा'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
No Response to "जोगवाः समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन"
Post a Comment