लिट्टेसाठी शस्‍त्र खरेदी करणा-यांना

Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk

तुरुंगवास
श्रीलंकेतील तमील बंडखोरांसाठी विमानभेदी क्षेपणास्त्र आणि इतर सैन्य उपकरणे खरेदीच्‍या योजनेत सहभागी असल्‍याचे सिध्‍द झाल्‍याने अमेरिकेत दोन कॅनडीयन नागरिकांना 26 व 14 वर्षाच्‍या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे.

सतक्षान सरचन्द्रन (30) आणि नादरास योगरासा (55) यांनी जमीनीवरून हवेवर मारा करणा-या क्षेपणास्त्र, मिसाइल लॉंचर आणि शेकडोंच्‍या संख्‍येने एके-47 खरेदी करण्‍याचा प्रयत्न केला होता. या शस्‍त्रांचा वापर श्रीलंकन सैन्‍या विरोधात केला जात असे.

सरचन्द्रन आणि योगरासा यांना जानेवारी 2009 मध्‍ये दोषी ठरविण्‍यात आले होते. त्यानुसार न्यूयॉर्कच्‍या जिल्‍हा न्‍यायालयाने सरचन्द्रनला 26 तर योगरासा यास 14 वर्षांच्‍या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "लिट्टेसाठी शस्‍त्र खरेदी करणा-यांना"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner