पाक म्हणतो, ईट का जवाब पत्थर से देंगे'
कराची
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) लिलावात पाकिस्तानी खेळाडूंची विक्री न झाल्याने पाकिस्तानातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा दोन्ही देशांचा संबंधावर परिणाम होईल, अशी धमकी पाक राजकारण्यांकडून दिली जात आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री एस.एम.कुष्णा यांनी आयपीएलशी सरकारला काही घेणे-देणे नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आयपीएल लिलावात पाकिस्तानचे 11 खेळाडू होते. परंतु या खेळाडूंना कोणत्याही फ्रॅंचाईजीने विकत घेतल नाही. यासंदर्भात बोलताना पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी हा पाकिस्तानचा अपमान असल्याचे म्हटले आहे. 'ईंट का जवाब पत्थर से देंगे' या शब्दात त्यांनी भारताला धकमकविले आहे. त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी आयपीएलचे पाकमध्ये प्रसारण होऊ न देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले,' पाकिस्तान खेळाडू शांतीदूत आहेत. त्यांचा झालेला अपमान म्हणजे भारताला दोन्ही देशात शांतता नको आहे. हे प्रकरण आम्ही सहजासहजी सोडून देणार नाही.' भारतात होणार्या हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत पाक संघ न पाठविण्याची मागणीही होत आहे.
आयपीएलच्या लिलावात पाक खेळाडूंची बोली न लावल्याबद्दल संसदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानमधील विरोधी पक्षाने पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळू देणे हा योजनाबद्ध कट असल्याचे संसदेत सांगितले. पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) नेते निसार अली खान यांनी पाकमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. पाकच्या संसद सदस्यांनी भारत दौराही रद्द केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावात ढावल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी भविष्यातही आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तानातील संबंध सामन्य होत नाही, तोपर्यंत पाक क्रिकेटर या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
दरम्यान पाकमधून व्यक्त होणारे सर्व आरोप परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी फेटाळले आहे. आयपीएलशी सरकारचा दूर, दूरचाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
No Response to "पाक म्हणतो, ईट का जवाब पत्थर से देंगे'"
Post a Comment