26/11 च्या वेळी मुंबई बिहारींनी वाचवली मराठींनी नव्हेः राहुल
Posted on Tuesday, February 02, 2010 by maaybhumi desk
मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याच्या वेळी मुंबईला दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करणा-या एनएसजी
कमांडोंमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जवानांची संख्या अधिक होती. त्यात कुणीही मराठी नव्हता. त्यावेळी मुंबईकर कुठे होते, असा सवाल कॉंग्रेस सरचीटणीस राहुल गांधी यांनी केला आहे.
सध्या बिहारच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी बिहारी तरुणांना महाराष्ट्रात होत असलेल्या मारहाणीच्या मुद्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला असून मुंबई हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांशी लढणारे उत्तर भारतीयच होते मराठी नव्हे असा खोचक टोला शिवसेना व मनसेला लगावला आहे.
राहुल यांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहणार असून मराठी-अमराठी वादाच्या राजकारणात आता शहीदांचेही प्रांतीकरण होऊ लागल्याने बुध्दीवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लेबले:
breaking news,
congress,
current news,
hot news,
indian news,
latest news,
Mumbai,
national news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "26/11 च्या वेळी मुंबई बिहारींनी वाचवली मराठींनी नव्हेः राहुल"
Post a Comment