तालिबानमध्ये आता लहान मुलेही
Posted on Monday, February 08, 2010 by maaybhumi desk
लंडन
दहशतवादी संघटना तालिबान आता अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिकांवर हल्ले करण्यासाठी अनेक ठिकाणी बॉम्ब पेरण्याचे काम करीत असून त्यासाठी 12 वर्ष वयाच्या मुलांची मदत घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याच्या कमांडर्सच्या म्हणण्यानुसार दहशतवादी बॉम्ब लावण्यासाठी लहान मुलांना प्रवृत्त करत आहेत. लहान मुलांना या कामामध्ये लावण्यामागे सैन्य लहानमुलांवर गोळीबार करणार नाही हे कारण आहे.
वरिष्ठ सैन्य अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांच्या कुटुंबीयांना तालिबानींकडून धमक्या दिल्या जात आहेत, की त्यांनी त्यांच्या मुलांना या कामासाठी तयार करावे अन्यथा परिणामांचा सामना करावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "तालिबानमध्ये आता लहान मुलेही"
Post a Comment