भारताचा पाकशी चर्चेचा प्रस्‍ताव

Posted on Monday, February 08, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानशी परराष्‍ट्र सचिव पातळीवरील चर्चा करण्‍याची तयारी दर्शविली असून त्यासाठी 18 किंवा 25 फेब्रुवारीची तारीख सुचविली आहे. या घटनेनंतर भारताने पाकशी सर्व मुद्यांवर पुन्‍हा चर्चेची तयारी दर्शविली आहे.

भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त शाहिद मलिक हे भारतीय परराष्‍ट्र सचिव निरूपमा राव यांच्‍याशी चर्चेनंतर प्रस्तावित तारीखांवर परराष्‍ट्र मंत्रालयासोबत चर्चा करण्‍यासाठी पाकमध्‍ये रवाना झाले आहेत.

पाकिस्‍तानी पक्ष याच आठवड्यात भारतासोबत चर्चेसंदर्भात निश्चित तारीख कळविण्‍याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दरम्‍यान, भारत सरकारच्‍या या धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी नाराजी व्‍यक्त केली असून भारताने पाकिस्‍तानी शक्तीला घाबरून चर्चा करण्‍याची तयारी दर्शविल्‍याचा दावा पाकचे परराष्‍ट्र मंत्री कुरैशी यांनी केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारताचा पाकशी चर्चेचा प्रस्‍ताव"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner