पक्षाच्‍या ज्येष्‍ठ नेत्यांना गडकरींनी खडसावले

Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk

इंदूर
भारतीय जनता पक्षाच्‍या कार्यपध्‍दतीत आता तरुणांचे राज्‍य आले असून पक्षातील ज्येष्‍ठ नेत्यांनीही ही बाब लक्षात घ्‍यावी. दुस-यांची रेषा लहान करण्‍याचा प्रयत्न करण्‍यापेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल हे पाहणे कधीही चांगले, असे परखड मत भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी व्‍यक्त केले आहे.


भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत लालकृष्ण अडवानी, माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांच्‍यासह पक्षाचे अनेक ज्येष्‍ठ नेते यावेळी उपस्थित होते. पक्षाला नवसंजीवनी देण्‍यासाठी पक्षात 'नवतीचे राज्‍य' आल्‍याचे सांगून त्यांनी ज्‍येष्‍ठ नेत्यांनाही त्यासाठी तयार राहण्‍याचे आवाहन केले.

पक्षातील नाराज नेत्यांना फैलावर घेताना ते म्हणाले, की कुठल्‍याही नेत्याने एक बाब स्‍पष्‍टपणे लक्षात घ्‍यावी, की आदर आणि सन्‍मान मागून मिळत नाही तर तो दुस-याला दिल्‍यानेच मिळतो. हे पटवून देताना त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कवितेतील 'छोटे काम से कोई बडा नही होता, तुटे मन से कोई बडा नही होता' या ओळीही उदघृत केल्‍या.

पक्षातील बंडखोर नेत्यांना खडसावताना त्यांनी सांगितले, की सामान्‍य कार्यकर्त्‍याला पक्षाकडून कसलीही अपेक्षा नसते त्यामुळे तो कधीही बंडखोरीचे झेंडे उभारत नाही. मात्र ज्याला पक्षाने सर्व काही देऊन मोठे केले तोच पक्षाच्‍या विरोधात जाणे चुकीचे असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पक्षाच्‍या ज्येष्‍ठ नेत्यांना गडकरींनी खडसावले"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner