'आम्ही बेईमान असू तर मग खेळू द्या ऑस्‍ट्रेलियनांना'

Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk

मुंबई

जर देशप्रेम बाळगणे आणि देशप्रेमाची गोष्‍ट करणे सर्वांनाच बेईमानी वाटत असेल तर शिवसैनिकांनी तरी या भानगडीत का पडावे. येऊ द्या ऑस्‍ट्रेलियनांना आणि खेळू द्या क्रिकेट, असे उद्वीग्नपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. 

या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी काढलेल्‍या एका पत्रकात म्हटले आहे, की शिवसेनेचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विरोध का आहे. हे कधी कुणी समजून घेण्‍याचा प्रयत्नच केला नाही. ऑस्‍ट्रेलियात भारतीयांवर रोजच हल्‍ले होत आहेत. तिथले सरकार ही बाब गांभीर्याने घ्‍यायला तयार नाही, अशा स्थितीत जर आम्ही देशाची अस्मिता आणि देशप्रेम म्हणून त्यांना विरोध केला. तर सर्वच आमच्‍यावर टीका करतात. त्यांच्‍या दृष्‍टीने आम्ही गुन्‍हेगार ठरतो. जर देशप्रेम बाळगून आम्ही बेईमान ठरत असू तर मग विरोध का करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी बाळासाहेबांनी इंडियन प्रीमियर लीगमध्‍ये (आयपीएल) ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्‍यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना आंदोलन न करण्‍यासाठी गळ घातली होती. मात्र बाळासाहेबांनी सोमवारी एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपला विरोध कायम असल्‍याचे जाहीर केले होते. आत अचानक त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'आम्ही बेईमान असू तर मग खेळू द्या ऑस्‍ट्रेलियनांना'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner