देशप्रेम गुन्हा असल्‍यास तो करूचः शिवसेनाप्रमुख

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

मुंबई

शिवसेने30323चा 'माय नेम इज खान'ला शिवसेनेचा विरोध नव्‍हताच तर अभिनेता शाहरूख खानने जे पाक प्रेमदाखवले आणि भारताचा अपमान केला त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. शाहरूखने शिवसेनेची माफी मागावीअसाही आमचा आग्रह नव्हता तर देशाची माफी मागावी, अशी आमची भूमिका होती. देश मोठा आहे, आम्ही खानयांच्या विरोधात उभे राहिलो ते देशप्रेमामुळे आणि देशप्रेम हा भारतात गुन्हा ठरत असेल तर तो गुन्हा शिवसैनिकपुन्‍हा-पुन्‍हा करतील, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.
सामनातून प्रकाशित झालेल्‍या पत्रकात शिवसेना प्रमुखांनी म्हटले आहे, की मतांच्या लाचारीमुळेच मुख्यमंत्री अशोकचव्हाण यांनी एके-४७ च्या बंदोबस्ताखाली चित्रपटाला हजेरी लावली. चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांनारक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि तुरुंगातही डांबले. मुख्‍यमंत्री जनतेच्‍या रक्षणासाठी आणि त्यांच्‍या अडचणीसोडवण्‍यासाठी आहेत की खानचे बॉडीगार्ड म्हणून काम करण्‍यासाठी असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसैनिकांनी ज्या पध्‍दतीने आंदोलन केले त्याबद्दल शिवसैनिकांचे आभार मानून शिवसेना प्रमुखांनी त्यांना शाबासकीही दिली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "देशप्रेम गुन्हा असल्‍यास तो करूचः शिवसेनाप्रमुख"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner