सी-लिंक वर आता 'एक्स रे स्‍कॅनर'

Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk

मुंबई

मुंबईची नवी शान म्हणून नावारूपाला आलेल्‍या वांद्रे ते वरळी सागरी मार्गावर आता रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला एक्स रे स्‍कॅनर लावण्‍यात येणार असून शक्य तितक्या लवकर हे स्‍कॅनर लावण्‍यात यावे अशा सूचना गृहमंत्रालयाने रस्‍ते विकास महामंडळाला दिल्‍या आहेत. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने आणि संभाव्‍य दहशतवादी हल्‍ल्‍याच्या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

वांद्र वरळी सागरी सेतू हा मुंबईतील रहदारीची कोंडी कमी करण्‍यासाठी महत्‍वाचा मार्ग ठरला असून सुमारे साडेतीन कि.मी.चा हा मार्ग दहशतवाद्यांच्‍या हीटलिस्‍टवर असण्‍याच्‍या सूचना गृहखात्याला मिळाल्‍या आहेत. त्‍यानंतर या रस्‍त्यावर सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात करण्‍यात आली असून या मार्गाच्‍या दोन्‍ही बाजूला एक्स रे स्‍कॅनर लावण्‍याबाबत रास्‍ते विकास महामंडळाला सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. या कामासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च येण्‍याची शक्यता असून ते शक्य तितक्या लवकर करण्‍यात यावे अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सी-लिंक वर आता 'एक्स रे स्‍कॅनर'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner