१३ आणि २६ शी दहशतवादाशी नाते
Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk
गेल्या दोन वर्षांत अतिरेक्यांनी भारतात ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यांसाठी १३ आणि २६ तारखांचीच निवड केली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या शनिवारी, १३ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाआधीही चार वेळा याच तारखांना दहशतवाद्यांनी मोठे उत्पात घडवून आणले आहेत.
जयपूरमध्ये १३ मे २००८ रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६४ जण ठार झाले. या घटनेनंतर दीड महिन्याने २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत ५७ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर १३ डिसेंबर २००८ रोजी देशाची राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट झाला होता. यात २६ जणांनी आपले प्राण गमावले.
संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झाला. यात १६६ जण ठार
झाले होते. तर नुकत्याच झालेल्या पुणे स्फोटात ९ जण ठार झाले. या सर्व घटना पाहता दहशतवाद्यांनी सातत्याने भारतात दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी १३ आणि २६ तारखांचीच आलटूनपालटून निवड केल्याचे दिसून येते.
लेबले:
breaking news,
current news,
german beckary,
national news,
news,
opinion,
osho aashram,
pune,
pune blast
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "१३ आणि २६ शी दहशतवादाशी नाते"
Post a Comment