'विंदा' करणार साहित्य संमेलनाचे उदघाटन
Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk
पुणे येथील स.प.महाविद्यालयाच्या प्रांगणात होणा-या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ कविवर्य विं.दा.करंदीकर यांच्या हस्ते होणार असल्याचे साहित्य महामंडळाने जाहीर केले आहे.
डॉ. देसाई, संमेलनाचे प्रमुख कार्यवाह डॉ. वि. भा. देशपांडे आणि सहकार्यवाह माधवी वैद्य यांनी संमेलनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याची विनंती विं.दा. करंदीकर यांना केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे. विंदांच्या काव्यवाचानाने उदघाटन होणार आहे. यात ते सुरूवातीला सुरुवातील मुक्ती संग्रामावरची कविता सादर करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'विंदा' करणार साहित्य संमेलनाचे उदघाटन"
Post a Comment