शिवसेनेची मान्यता रद्द करा- राणेंची मागणी

Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk

मुंबईrane17Nov1258479158_storyimage
शिवसेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी अशी मागणी कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री नारायण राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीचे सुतोवाच त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आधी केले होते. शिवसेना प्रांतीयवाद जोपासत असल्याने राणे यांनी हे पाऊल उचलले आहे.

राणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. शिवसेनेची स्वतःची घटना आहे. पण घटना गुंडाळून पक्ष चालवला जात आहे. घटनेमध्ये आम्ही प्रांतीयवाद जोपासणार नाही, धार्मिक विद्वेष पसरवणार नाही, असे म्हटले आहे. पण शिवसेना स्वतःच्या घटनेच्या विपरीत वागत आहे, असे राणे यांनी आयोगाच्या निदर्शनास आणले आहे. आता आयोग शिवसेनेला नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागविल. त्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शिवसेनेची मान्यता रद्द करा- राणेंची मागणी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner