पाकिस्तान मोठी चिंताः बिडेन

Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन
अफगाणिस्तान किंवा ईराण पेक्षाही पाकिस्तान अमेरिकेसाठी चिंतेचा मोठा विषय असून या देशात कट्टरवाद्यांचेसमांतर शासन चालत असल्‍याचे मत अमेरिकेचे उपराष्ट्राध्‍यक्ष जो बिडेन यांनी व्‍यक्त केले आहे.

बिडेन म्हणाले, की पाकिस्‍तान एक मोठा देश आहे आणि त्‍यांच्‍याकडे अण्‍वस्‍त्रे तैनातीची क्षमता आहे. ते म्हणाले,की पाक पूर्णतः सक्रीय लोकशाही राष्‍ट्र असून या देशात कट्टरवाद्यांकडून समांतर सरकार चालवण्‍याचा प्रयत्न केलाजात आहे. हा चिंतेचा विषय आहे.

तालिबानच्‍या ताब्यात असलेल्‍या हेलमंद खो-यावर ताबा प्रस्‍थापित करण्‍यासाठी अमेरिका आणि नाटो सैनिकांनीहल्‍ल्‍याची तयारी पूर्ण केली असून या अभियानास व्‍यापक बनवण्‍यासाठी ओबामा प्रशासनाने पाकवर दबाव निर्माणकरण्‍यास सुरूवात केली आहे, अशा पार्श्‍वभूमीवर बिडेन यांच्या वक्तव्‍यास महत्‍वाचे समजले जात आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पाकिस्तान मोठी चिंताः बिडेन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner