असा आहे कोरेगाव पार्क परिसर
पुणे
ओशो आश्रमामुळे कोरेगाव पार्क परिसर जगभर परिचित झाला आहे. उच्चभ्रू लोकांचा वावर असलेल्या या परिसरातील जागेला सोन्यापेक्षाही जास्त मूल्य आहे. विदेशी नागरिकही आणि सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्यांचेही निवासस्थान या परिसरात आहे. मुंबईतील नरीमन पॉईंटप्रमाणे पुण्यातील कोरेगाव पार्क हे महत्वाचे ठिकाणी आहे. यामुळे या परिसरात बॉंबस्फोट झाल्याने सारेच हादरले आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून बंड गार्डन पोलिस स्टेशनही जवळ आहे.
ओशो आश्रम, हॉटेल ताज ब्ल्यू डायमंड यामुळे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसराची ओळख जगभर परिसरली आहे. निवृत्त लोकांचे निवासस्थान असलेला पुण्यातील बंड गार्डन परिसरात कोरेगाव पॉर्क हा उच्चभ्रू लोकांचे वस्तीस्थान आहे. आचार्य रजनीश यांच्या ओशो आश्रमामुळे परिसरात विदेशातील नागरीकही मोठ्या प्रमाणावर राहतात. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जर्मन बेकरीतही देशी तसेच परदेशी ग्राहकांचा नेहमीच राबता असतो. या हायप्रोफाइल परिसरात 26/11 चा मास्टरमाइंड डेव्हीड हेडलीही या भागात येऊन गेल्यामुळे या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होते.
No Response to "असा आहे कोरेगाव पार्क परिसर"
Post a Comment