'खान'च्या मुंबई रिलीजवरून पुन्हा 'रण'
Posted on Tuesday, February 09, 2010 by maaybhumi desk
मुंबई
करण जोहर आणि शाहरूख खानच्या 'माय नेम इज खान'ला मुंबईत कुठल्याही स्थितीत प्रसारित होऊ देणार नसल्याचे जाहीर करत शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी खान विरोधात गुंडाळलेले आंदोलन पुन्हा सुरू केले आहे.
चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने या चित्रपटाला संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज थिएटर मालकांसह मुंबईचे पोलीस कमिशनर डी. शिवनंद यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेने हे आंदोलन सुरू केले आहे.
यापूर्वी शिवसेनेने आपण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र तरीही जोहर पोलिसांना जाऊन भेटल्याने हा विषय पुन्हा पेटला आहे.
दरम्यान, चीडलेल्या शिवसैनिकांनी भांडूपमधील दोन चित्रपटगृहांमध्ये तोडफोड केली असून त्यानंतर आंदोलन तीव्र झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'खान'च्या मुंबई रिलीजवरून पुन्हा 'रण'"
Post a Comment