'प्रोटक्शनवरून' मुंबईत 'टेन्शन'
Posted on Wednesday, February 10, 2010 by maaybhumi desk
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी करून घेण्यासंदर्भात शाहरुख खानने केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा मुंबईतील 'राडा' कमी होण्याची चिन्हे दिसत नसून शिवसैनिकांनी राडा न थांबवल्यास सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे संरक्षण काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर उद्धव यांनी आपले संरक्षण सरकारला परत केले आहे.
यापूर्वी सरकारने सेनेच्या चार आमदारांचे संरक्षण काढून घेतले असून आता उध्दव यांनीही संरक्षण परत केल्याने सेनेच्या सर्व आमदारांनी आपले संरक्षण परत केले आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या मुंबई दौ-यात सेनेने त्यांना आव्हान दिल्याने नाराज कॉग्रेस सरकारने उद्धव यांचे संरक्षण काढून घेण्याची धमकी दिली होती. त्यास प्रत्युत्तर म्हणूनही उद्धव यांच्या या कृतीकडे पाहिले जात आहे.
सुरक्षा-व्यवस्था परतवल्यानंतर उद्धव यांनी सरकारच्या कुठल्याही धमकीला आपण घाबरत नसल्याचे सांगत 40 वर्षांपासून शिवसेना रस्त्यावर काम करते आहे. त्यामुळे आपल्याला सुरक्षेची गरज नसल्याचे सांगितले आहे.
शाहरुखच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटाला मुंबईत प्रदर्शित न करण्याचा इशारा सेनेने थिएटर चालकांना
दिला असून तो प्रदर्शित व्हावा यासाठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जौहर यांनी मंगळवारी मुंबई पोलीस कमिशनर डी. शिवानंद आणि संयुक्त पोलीस आयुक्त हिमांशु रॉय यांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केल्यानंतर प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
दरम्यान, शिवसैनिकांनी घाटकोपर, मुलुंड आणि कांजुरमार्गमधील चित्रपटगृहांमध्ये जोरदार तोडफोड केली. या घटनेनंतर या चित्रपटाचे एडव्हांस बुकिंग बंद करण्यात आले आहे. तर या प्रकरणी 400 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर शाहरूख अबुधाबीला रवाना झाला असून आपण परत येऊन बाळासाहेबांची भेट घेणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.
हे देखिल वाचाः
'माय नेम इज खान'ची समीक्षा
'खान'च्या मुंबई रिलीजवरून पुन्हा 'रण'
माय नेम इज खान
शाहरुख खानचा आता मनसेला 'चिमटा'
संघाने आम्हाला अस्मिता शिकवू नयेः उध्दव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'प्रोटक्शनवरून' मुंबईत 'टेन्शन'"
Post a Comment