'मायभूमी' आयपीएल -3 लाईव्‍ह स्‍कोर सेवा

Posted on Friday, March 12, 2010 by maaybhumi desk

मुंबई


मायभूमी.कॉमने आपल्‍या वाचकांसाठी आयपीएल क्रिकेटचा टी-20 थरार अनुभवण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. मायभूमीचा मोफत टुलबार डाऊनलोड करून घरी, ऑफीसात किंवा कुठेही सामन्‍यांचा लाईव्‍ह स्‍कोर या सोईद्वारे पाहता येणार आहे.


केवळ एकदा टुलबार डाऊनलोड करावा लागणार असून ही पध्‍दत अतिशय सोपी आहे. त्यासाठी 'क्रिकेट स्‍कोर' या लिंकवर क्लिक करून समोर आलेल्‍या डाऊनलोड या ऑप्‍शनवर क्लिक करायची आहे. हा टुलबार डाऊनलोड झाल्‍यानंतर तुमच्‍या ब्राऊझरवर दिसेल. त्‍यातून क्रिकेट लाईव्‍ह स्कोअरकार्ड व बॅटींग आणि बॉलींगची विस्‍तृत माहिती पाहता येणार आहे.


'मायभूमी'च्‍या टुलबारमध्‍ये दिलेली ही सुविधा वाचकांमध्‍ये अल्‍पावधीच लोकप्रिय झाली असून त्‍यासाठी वारंवार कुठल्‍याही लाईव्‍ह स्‍कोरकार्ड दाखवणा-या वेबसाईटवर जाण्‍याची गरज नसते. तसेच एकापेक्षा जास्‍त सामने सुरू असले तरीही त्यांचा स्‍कोरकार्ड वेगवेगळा पाहता येण्‍याची सोय यात आहे. आपल्‍या कम्‍प्‍युटरवर काम करताना किंवा आपल्‍या आवडीची वेबसाईट पाहताना एका बाजूला स्‍कोरकार्ड सुरू करून तो हवा तिथे ओढून नेता येण्‍याची सोय यात आहे.


या टुलबारमध्‍ये आयपीएल व्‍यतिरिक्त भारताकडून खेळल्‍या जाणा-या आणि भारता व्‍यतिरिक्त दुस-या देशांमध्‍ये खेळल्‍या जाणा-या सर्व सामन्‍यांचा धाव फलक लाईव्‍ह पाहण्‍याचीही सोय आहे. ही सोय फक्त एक क्लिकवर तुमच्‍या संगणकावर स्‍थापित होऊ शकते. आपोआप रिफ्रेश होणा-या या स्‍कोरकार्डला सोयीनुसार जागेवरून हलवता किंवा लहान-मोठे करता येते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'मायभूमी' आयपीएल -3 लाईव्‍ह स्‍कोर सेवा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner