हॉकीत भारत आठव्या क्रमांकावर
Posted on Friday, March 12, 2010 by maaybhumi desk
मायभूमीवर झालेल्या 12 व्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये मोठ्या अपेक्षांचे ओझे घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला असून शुक्रवारी अर्जेंटीना सोबतचा सामना भारतीय संघाने 2-4 ने गमावला. या विजयासोबतच अर्जेंटीना मालिकेत सातव्या तर भारत आठव्या क्रमांकावर राहीला. भारतीय संघाची गेल्या 16 वर्षांतली ही सर्वोत्तम कामगिरी असून गेल्या वेळी संघ 11 व्या स्थानावर होता.
मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर झालेल्या भारत आणि अर्जेंटीनातील सामना अपेक्षेप्रमाणे वेगवान झाला. मात्र हाती आलेल्या संधीचा वापर न करता आल्याने संघाला पराभव पत्करावा लागला.
सामन्यातील पहिला गोल अर्जेटीनासाठी थॉमस अर्जेटो याने 28 व्या मिनिटाला केला. हाफ टाइमपर्यंत मागे पडलेल्या संघाला 42 व्या मिनिटाला संदीप सिंहने पॅनल्टी स्ट्रोकच्या माध्यमातून गोल करून बरोबरी मिळवून दिली.
मात्र त्यानंतर मार्टिन लुकासने 43 व्या मिनिटाला एक आणि पाकुंडो केलियानी (45 व्याव 46 व्या मिनिटाला) दोन गोल करून भारताला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. भारतचा दुसरा गोल शिवेंद्र सिंहने 49 व्या मिनिटाला केला. भारताने पहिल्या सत्रात दोन पॅनल्टी कॉर्नर वाया घालविले.
दरम्यान, सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर येत असलेल्या भारतीय संघाच्या दिशेने एका बाजूच्या काही प्रेक्षकांनी ‘प्रभज्योत हाय-हाय’च्या घोषणा केल्यानंतर चिडलेल्या प्रभज्योत सिंहने मिक्स्ड झोनकडे येत प्रेक्षकांच्या दिशेने दोन वेळा असभ्य हातवारे केले.
लेबले:
breaking news,
current news,
hockey world cup,
hot news,
india,
indian news,
sports,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "हॉकीत भारत आठव्या क्रमांकावर"
Post a Comment