कॉंग्रेसला आता अभिषेकचीही एलर्जी!
Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk
कॉंग्रेस आणि बॉलीवुड शहंशाह अमिताभ बच्चन यांच्यातील दूरावा सातत्याने वाढत चालला असून वांद्रे-वरळी सी लिंकच्या उदघाटनास अमिताभ यांना बोलावल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून शिकवण घेत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अभिषेक बच्चन पासूनही दुरावा राखण्याचा प्रयत्न केला आहे.
बच्चन आणि बोलबच्चन
'अर्थ आवर' दरम्यान दिल्लीत एका कार्यक्रमात अभिषेक बच्चनचा व्हीडिओ चालविला जाणार होता. मात्र तो चालविला गेला नसून या कार्यक्रमासाठीचे अभिषेकचे पोस्टर्सही काढून घेण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात आज आपल्या ब्लॉगवरून नाराजी व्यक्त केली आहे.
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे, की अभिषेकचा व्हीडिओ संदेश या कार्यक्रमातून काढून टाकण्यात येण्यामागे काय कारण असावे. मी या संदर्भात गोंधळलो असून असे का केले गेले असावे हे मला समजू शकलेले नाही.
