किंगफिशरच्या विमानात बॉम्ब ठेवणा-यास अटक
Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk
तिरूवनंतपुरम पासून बंगळुरूकडे जात असलेल्या किंगफिशरच्या विमानात काही दिवसांपूर्वी गावठी बॉम्ब ठेवून घबराट निर्माण करणा-या व्यक्तीस पोलिसांनी आज अटक केली आहे. या आरोपीची चौकशी केली जात आहे.
विमानात सापडला गावठी बॉम्ब
गेल्या 21 मार्च रोजी किंगफिशरच्या 4731 क्रमांकाच्या विमानात गावठी बॉम्ब आढळून आल्याने घबराट निर्माण झाली होती. एका वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
विमान बंगळुरूवरून उड्डाण घेण्यापूर्वी एका प्रवाशाचे त्याकडे लक्ष गेल्यानंतर विमान पुन्हा खाली उतरवून तपासणी करण्यात आली होती. ही घटना हवाई सुरक्षेतील मोठी चूक समजली जात आहे.