मराठी चित्रपट निर्मिती अभिमानास्‍पद बाबः अमिताभ

Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk

पुणे

मी गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असून मराठी भाषेबद्दल आणि महाराष्‍ट्राबद्दल सामान्‍य मराठी माणसा इतकाच मलाही अभिमान आहे. त्यामुळे मी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि यापुढेही करत राहीन, असे प्रतिपादन महानायक अमिताभ बच्‍चन यांनी पुणे येथे केले.

अमिताभ बच्‍चन कार्पोरेशन लिमिटेडची निर्मिती असलेल्‍या विहीर या मराठी चित्रपटाच्‍या प्रिमियरसाठी पुणे येथे आलेल्‍या अमिताभ यांनी यावेळी आपल्‍या कर्मभूमीबद्दल कृतज्ञता व्‍यक्त केली.


अमिताभ म्हणाले, की जया बच्‍चन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्‍यातील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्‍या निर्मितीस होकार दिला. जया यांचा हा विश्‍वास उमेश यांनी सार्थ ठरविला असून चित्रपटाला जगभरात प्रसिध्‍दी मिळवून दिल्‍याबद्दल आणि महत्‍वाच्‍या उंचीवर नेल्‍याबद्दल उमेश कुलकर्णी यांचे कौतुक केले पाहिजे. यापुढेही मराठी चित्रपट नक्कीच करत राहीन असा विश्‍वासही त्यांनी व्‍यक्त केला.

यावेळी अमिताभ यांनी चित्रपटाच्‍या कलाकारांसह चित्रपट पाहिला.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner