मोदींचा नव्हे गुजरातचा 'ब्रँड अम्बेसिडर'- अमिताभ
Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
मी नरेंद्र मोदींचा नव्हे तर राज्याचा 'ब्रँड अम्बेसिडर' आहे. माझी बांधिलकी त्या राज्यातील जनतेशी आणि
देशवासियांशी आहे, असा पलटवार महानायक अमिताभ बच्चन यांनी आज काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना केला.
गुजरातचा 'ब्रँड अम्बेसिडर' होण्यामागे आपला कोणताही राजकीय हेतू नव्हता. मोदी हे त्या राज्याचे मुख्यमंत्री
असल्याने त्यांनी आपल्याला विचारणा केली व आपण त्यांच्या विनंतीला होकार दिला.
यामध्ये राजकारण कोणते, असा उलट प्रश्नही बच्चन यांनी विचारला आहे.
लेबले:
breaking news,
current news,
film,
india,
indian news,
maharashtra news,
national news,
news,
pune,
top news