मुंबई व डेक्कनची लढत आज रंगणार

Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk


मुंबई

आयपीएल-3 मध्‍ये आतापर्यंत जोरदार फॉर्ममध्‍ये असलेल्‍या मुंबई इंडियन्‍स संघाचा रविवारी आपल्‍या घरगुती मैदानावर डेक्कन चार्जर्स सोबतचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकुन सचिन तेंडुलकरचा संघ हॅट्रिक बनविण्‍याचा प्रयत्न करणार आहे.

आयपीएल सामन्‍यांचा लाईव्‍ह स्‍कोर पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा
 
मास्‍टर ब्लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्‍स संघाने आतापर्यंत सलग दोन सामने जिंकले असून एकूण चार सामने जिंकून गुणानुक्रमात अव्‍वल स्‍थान पटकावले आहे. तर एडम गिलख्रिस्टच्‍या नेतृत्वाखालील चार्जर्सचा संघ पाच पैकी दोन सामने जिंकून चवथ्‍या क्रमांकावर आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner