कोयना आता उघडणार व्यवसाय
Posted on Saturday, March 27, 2010 by maaybhumi desk
कोयनाला प्राणी खूप आवडतात. तिच्या घरात बरीच कुत्रीही आहेत. त्यामुळे त्याचा तिला अनुभवही आहे. म्हणूनच ती आता त्यासंदर्भात दुकान उघडतेय. पेट फूड, एक्सेसरीज, डॉगी बोन लॉकेटस, हेअर बॅंड या सगळ्या गोष्टी तिथे मिळतील.
रोड या चित्रपटापासून तिचे करीयर सुरू झाले, परंतु त्याने कधी उंची गाठली नाही. आठ वर्षे बॉलीवूडमध्ये राहूनही तिला स्वतःचे स्थान निर्माण करता आले नाही. तिने अंगप्रदर्शनही केले, पण तरीही तिला कोणीही पहायला थिएटरात आले नाही.
