पंजाबची पराभवाची हॅट्रीक, डेक्कनची सरशी
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
कटक
कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका चुरशीच्या सामन्यात डेक्कन चार्जर्सने पंजाब किंग्स इलेवनचा 6 धावांनी निसटता पराभव केला आहे. यामुळे पंजाबची मालिकेत पराभवांची हॅट्रीक झाली आहे. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या डेक्कनने निर्धारित 20 षटकात 170 धावा केल्या. तर पंजाबचा संघ उत्तरादाखल 164 धावाच करू शकला.
आयपीएल सामन्यांचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा
संघाकडून अष्टपैलू इरफान पठाणने 29 चेंडूत 60 धावांची धमाकेदार खेळी केली. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली.
डेक्कन चार्जर्ससाठी आपले गृहमैदान लकी ठरले. किंग्स इलेवन पंजाबचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकून डेक्कन चार्जर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याचा हीरो ठरलेल्या एंड्रयु सायमंड्सने 38 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली. तर गोलंदाजीतही 4 षटकात 22 धावा देत 1 गडी बाद केला.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
IPL,
IPLcricketnews/ iplscore,
latest news,
top news,
आयपीएल
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "पंजाबची पराभवाची हॅट्रीक, डेक्कनची सरशी"
Post a Comment