माओवादी नेता किशनजीकडून हल्ल्याची धमकी
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
कोलकाता
जर केंद्र सरकारने ऑपरेशन ग्रीन हंट त्वरित बंद केले नाही तर आपण मोठ्या प्रमाणावर हल्ले करू अशी धमकी भूमीगत माओवादी नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजीने दिली आहे. शुक्रवारी पश्चिम मिदनापूरमध्ये काही निवडक पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
किशनजीच्या म्हणण्यानुसार माओवादी लोकशाही मार्गाने केंद्राच्या अपयशाचा प्रचार करत आहेत. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत असून जवळपास सर्वच विद्यार्थी संघटनांचाही आम्हाला पाठिंबा आहे.
तसेच ऑपरेशन ग्रीन हंटला विरोध करणा-या तृणमूल कॉंग्रेस खासदार कबीर सुमन यांच्या सारख्या बुद्धिजीवी लोकांशीही चर्चा करण्यास तयार आहोत. आम्हाला समजून घेणा-या या बुद्धीवाद्यांनी केंद्राशी चर्चेत आम्हाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "माओवादी नेता किशनजीकडून हल्ल्याची धमकी"
Post a Comment