आता पाकिस्तानी जाहिरातीत भारतीय लोगो
इस्लामाबाद
भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एका जाहिरातीत पाकिस्तानी सैन्य अधिका-याचा फोटो छापला जाण्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच आता पाकिस्तानमध्येही तशीच चूक झाली असून तेथील पंजाब प्रांत पोलिसांच्या वृत्तपत्रातील एका जाहिरातीत भारतीय पंजाब पोलिसांचा लोगो छापण्यात आला आहे. या घटनेनंतर तेथील जनतेत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत प्रांत सरकारला खुलासा द्यावा लागला आहे.
पाकमधील अनेक इंग्रजी आणि उर्दु वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात छापून आली आहे. या जाहिरातीत लोकांना दहशतवादी हल्ले आणि गुन्हेगारी थांबविण्यासाठी मदतीचे आवाहन करणा-या या जाहिरातीत पंजाब पोलीस या नावासमोर भारतीय पंजाब पोलिसांचा लोगो लावला आहे.
या संदर्भात पाक पंजाब पोलीस प्रमुख तारिक सलीम डोगर यांनी जाहिरात एजन्सीला याबाबत जबाबदार ठरविले आहे. आपण कंपनीला योग्य लोगो पुरवला असतानाही ही चूक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही बोधचिन्हात बराच फरक आहे.
No Response to "आता पाकिस्तानी जाहिरातीत भारतीय लोगो"
Post a Comment