डॉ. मुणगेकर व जावेद अख्तर राज्यसभेवर
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासह पाच जणांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील बारा खासदारांची राज्यसभेवर नियुक्ती केली जात असते.
यात डॉ.भालचंद्र मुणगेकर, गीतकार जावेद अख्तर, रांची विद्यापीठाचे माजी कुलगुरू राम दयाल मुंडा, कन्नड अभिनेत्री बी. जयश्री आणि माजी केंद्रीयमंत्री मणिशंकर अय्यर यांचा समावेश आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "डॉ. मुणगेकर व जावेद अख्तर राज्यसभेवर"
Post a Comment