शिक्षणसम्राटांवर वचक ठेवणार्या विधेयकास मंजुरी
नवी दिल्ली
प्रवेशाच्या वेळी वेगवेगळी आमीषे दाखवून भरमसाठ फी उकळणार्या आणि नंतर साफ निराशा करणा-या शिक्षण संस्था चालकांविरुध्द कठोर कारवाईचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्या संदर्भातील विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. या विधेयकानुसार फसवणूक करणा-या अशा शिक्षण संस्थांना 50 लाखांचा दंड किंवा संस्थाचालकांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतुद आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणा-या संस्था आणि विद्यापीठांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हे विधेयक संमत केले असून, त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली.
विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थां संदर्भातील वाद सोडवण्यासाठी शैक्षणिक न्यायालयाची स्थापना आणि शैक्षणिक संस्थांचे निकष ठरवून त्यांना मान्यता देणे यासाठीही यंत्रणा उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या सत्रात हे विधेयक मंजुरीसाठी सादर होणार आहे.
No Response to "शिक्षणसम्राटांवर वचक ठेवणार्या विधेयकास मंजुरी"
Post a Comment