भारत अफगाणमधून माघारीच्या तयारीत

Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk

अफगाणिस्तानमध्ये सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर भारत आता इतर सर्व पर्यायांसह तेथील सर्व कामे गुंडाळून माघार घेण्याच्या विचारात आहे. याशिवाय तेथे उर्जा आणि रस्ते प्रकल्पात काम करणार्‍या सर्व भारतीयांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीकोनातून एकत्रित आणण्यात येणार आहे.

काबूलमध्ये गेल्या २६ फेब्रुवारीला भारतीय गेस्ट हाऊसवर तालिबानी हल्ला झाला होता. त्यात सात भारतीयांचा मृत्यू झाला. यासंदर्भात स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन काबूलला गेले होते. तेथून परतल्यानंतर भारताचा हा विचार प्रसृत झाला आहे. अफगाणिस्तानात सध्या कार्यरत असलेल्या सर्व भारतीयांना परतण्याचा सल्लाही भारतातर्फे दिला जाण्याची शक्यता आहे.

काबूलशिवाय अफगाणिस्तानात हेरात, कंदाहार, मजार ए शरीफ व जलालाबाद येथे भारताच्या वकिलाती आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारत अफगाणमधून माघारीच्या तयारीत"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner