माया'हार' प्रकरण: पांडेंची उचलबांगडी

Posted on Friday, March 19, 2010 by maaybhumi desk

लखनऊ

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या 'हार' प्रकरणी आता राज्याचे माहिती व प्रसिद्धी प्रमुख तसेच अतिरिक्त कॅबिनेट सचिव विजय शंकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पांडे यांच्या खराब व्यवस्थापनामुळेच 'हार' प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्याचा ठपका मायावतींनी त्यांच्यावर ठेवला आहे.

बसपच्या लखनौ रॅलीमध्ये मायावती यांच्या गळ्यात कोट्यवधीच्या नोटांचा हार घातल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या विरोधात लोकसभेत जोरदार आक्षेप घेतला. त्यांची चौकशी करण्याचीही मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणी हार मानण्यास मायावती तयार नसून, त्यांनी आपल्या निकटवर्तियांनाच यात दोषी ठरवत त्यांची मानगुटी धरण्यास सुरुवात केली आहे.


यापूर्वी मायावती यांनी कर्नाटकचे बसप प्रवक्ते शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आता एका सनदी अधिका-याला मायांचा हार अंगलट आला आहे. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "माया'हार' प्रकरण: पांडेंची उचलबांगडी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner