डेव्हीड हेडलीची गुन्ह्यांची कबुली
शिकागो
पाकिस्तानी वंशाचा मूळ अमेरिकी दहशतवादी असलेल्या डेव्हिड हेडली याने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व 12 गुन्हे मान्य केले आहेत. मुंबई हल्ल्यातही आपला हात असल्याचे त्याने न्यायालयात स्पष्ट केले आहे. हेडलीला शिकागो न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.
हेडलीला अमेरिकी एफबीआयने काही महिन्यांपूर्वी अटक केली आहे. त्याचा मुंबई हल्ल्यांसह डेनमार्क येथील एका वर्तमानपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यात हात असल्यासह एकूण 12 गुन्हे त्याच्यावर लावण्यात आले आहेत. हेडलीने या सर्व गुन्ह्यांची शिकागो न्यायालयात कबुली दिली आहे.
पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबासह इतर अनेक दहशतवादी संघटनांशी आपले संबंध असल्याचेही त्याने मान्य केले आहे. हेडलीने गुन्हे मान्य केल्यास त्याची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर हेडलीने आपले गुन्हे मान्य करण्याची तयारी दर्शवली होती.
No Response to "डेव्हीड हेडलीची गुन्ह्यांची कबुली"
Post a Comment