फसलेला जुगारः तीन पत्ती

Posted on Monday, March 01, 2010 by maaybhumi desk

सेरेनडिपिटी फिल्म्स प्रस्तुत
निर्माती- अंबिका हिंदुजा
दिग्दर्शिका- लीना यादव
लेखक- शिव सुब्रमण्यम
संगीतकार-सलीम सुलेमान
कलाकार- अमिताभ बच्चन, बेन किंग्जले, आर. माधवन, सिद्धार्थ. वैभव, ध्रुव गणेश, श्रद्धा कपूर, सायरा मोहन आणि रायमा सेन.

जुगार हा कधीही वाईटच. जुगाराने अनेकांचे जीवन बरबाद केलेले आहे. त्यामुळे जुगारापासून प्रत्येकाला दूर रहाण्याचेच आवाहन केले जाते. अगदी असेच आवाहन अमिताभ बच्चनच्या नव्या चित्रपटाच्या तीन पत्तीबाबतही केले जाऊ शकते. चित्रपटाचे कथानक थोडे वेगळे होते परंतु त्याचे पडद्यावर सादरीकरण असे सादर केले आहे कि ते पहावत नाही. अगदी तकलादू पद्धतीने सादरीकरण केल्याने चित्रपट कधी एकदा संपतो असे वाटत रहाते. चित्रपटात सस्पेंस राखण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यात दिग्दर्शिका यशस्वी झालेली नाही.

click hereवेंकट सुब्रमण्यम (अमिताभ बच्चन) गणितज्ज्ञ असतो. तो गणितावर आधारित अनेक प्रबंध सादर करतो परंतु त्याचा एकही प्रबंध स्वीकारला जात नाही. असेच एक दिवस कॉम्प्युटरवर पत्ते खेळताना तो आकडेमोड करतो आणि खेळतो. यात तो जिंकतो. यामुळे उत्साहित होऊन तो एक प्रयोग करतो. प्रयोग यशस्वी झाल्यावर कॉलेजमधील एक प्राध्यापक शांतनु (आर. माधवन) आणि सिद्धार्थ बजाज (सिद्धार्थ खेर), अब्बास शेख (वैभव तलवार) अपर्णा खन्ना (श्रद्धा कपूर), बिक्रम अश्विन धीर (ध्रुव गणेश)च्या मदतीने आपला प्रयोग सिद्ध करण्यासाठी जुगाराच्या अड्ड्‌यावर जातो. तेथे तो जिंकतो परंतु वेंकटच्या जीवनात या खेळाने एक नवीन संकट निर्माण होते. एक ब्लॅकमेलर त्याला या विद्यार्थ्यांना मारण्याची धमकी देऊन जुगार खेळायला लावतो आणि त्यापोटी पैसे कमावतो. शेवटी शांतनु वेंकटचा हा नवा प्रबंच्च् इंग्लंडमध्ये पाठवतो आणि या प्रबंधासाठी वेकंटला पुरस्कार मिळतो. आपल्या जुगाराची ही कथा वेंकट इंग्लंडमधील प्रख्यात गणितज्ज्ञ पर्सी ट्रेटेनबर्गला (बेन किंग्जले) सांगतो.

अमिताभ बच्चनने वेंकटची भूमिका नेहमीप्रमाणेच केली आहे परंतु तो आपली छाप पाडत नाही.

अमिताभकडून वेगळे पहाण्याची इच्छा असते जी यात पूर्ण होत नाही. खांदे पडलेला हताश प्राध्यापक मनाचा ठाव घेत नाही. आर. माधवनचा शांतनुही छाप पाडत नाही. सिद्धार्थ. वैभव, धृव गणेश ठीकठाक आहेत. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर मात्र आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरली आहे. बेन किंग्जले यांनी हा चित्रपट का केला असावा तेच कळत नाही. रायमा सेन काही दृश्यात दिसली आहे. शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ आणि अजय देवगण एकेका दृश्यासाठी पडद्यावर येतात. हिंदुजा समूहाने यापूर्वी बूमसारख्या अत्यंत घाणेरड्या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. परंतु त्या चित्रपटानंतरही त्यांनी काही शिकवण घेतलेली आढळत नाही.

दिग्दर्शिका लीना यादवने यापूर्वी एका लेखकाची कथा 'शब्द'मध्ये अत्यंत वाईटरित्या मांडलेली होती. तीन पत्तीमध्येही तिच्यात काही बदल झालेला जाणवत नाही. केवळ नरेशन चांगले असून चालत नाही तर ते पडद्यावर मांडताही यायला पाहिजे. सलीम-सुलेमानच्या संगीतातही काही दम नाही. 'तेरी नियत खराब है' हे गाणे सादरीकरणामुळे चांगले वाटते. एकूणच या तीन पत्तीपासून दूर राहिलेलेच बरे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "फसलेला जुगारः तीन पत्ती"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner