सुंदरवनमधील वाघांना 'रेडीओ कॉलर' लावणार

Posted on Tuesday, March 02, 2010 by maaybhumi desk

वेगाने संपत चाललेल्‍या वाघांच्‍या संरक्षण आणि संवर्धनासाठी आता सुंदरवन प्रशासनाने अभयारण्‍यातील वाघांच्‍या गळ्या भोवती रेडियो कॉलर लावण्‍यात निर्णय घेतला आहे. सुंदरवन बायोस्पीयर रिजर्वचे संचालक प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली असून नुकताच दक्षिण 24 परगना जिल्‍ह्यातील गोसाबा भागात एका वाघिणीवर कॉलर लावण्‍यात आल्‍याचे आणि आणखी इतरांवरही ते
लावले जाणार असल्‍याचे त्यांनी सांगितले.

व्‍यास यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सुंदरवनात आतापर्यंत वाघांच्‍या हालचालींवर केवळ त्यांच्‍या मागोव्‍याच्‍या माध्‍यमातूनच लक्ष ठेवले जात आहे. मात्र त्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्‍यासाठी रेडिओ कॉलरची मदत घेतली जाणार आहे.

गोसाबा भागातील वाघिणीवर लावण्‍यात आलेल्‍या रेडियो कॉलरमधून तिच्‍यावर लक्ष ठेवणे सोपे जात आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सुंदरवनमधील वाघांना 'रेडीओ कॉलर' लावणार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner