शिकारीसाठी वाघांची अवैध 'फार्मिंग'

Posted on Tuesday, March 02, 2010 by maaybhumi desk

गुइलीन

आंतरराष्‍ट्रीय नियमांची पायमल्‍ली करून चीनमध्‍ये वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जात असल्‍याची माहिती समोर आली आहे. वाघांच्‍या हाडांचा वापर काही औषधींसाठी केला जात असल्‍याने येथे मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार केली जात असल्‍याचा दावा काही सामाजिक संस्‍थांनी पुराव्‍यानिशी केला आहे.

वाघांच्‍या हाडांसाठी येथे त्‍यांची अवैध पैदास आणि कत्तल केली जात असल्‍याचेही एका गुप्‍त माहितीतून समोर आले आहे. येथील डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्तानुसार चीनच्‍या गुइलीन शहरात वाघांची फार्मिंग केली जात असल्‍याचे आणि त्‍यात सुमारे 1500 वाघ बाजारात वापरासाठी बंदी बनवून ठेवले आहेत. जगभरात आज केवळ तीन हजाराच्‍या आसपास वाघ शिल्‍लक आहेत.

गुइलीनच्‍या फार्मिंगमध्‍ये सुमारे 1500 वाघ बंदी बनवून ठेवण्‍यात आले असून त्यांची केव्‍हाही कत्तल केली जाण्‍याची शक्यता आहे. एका वाघाच्‍या अस्थिंपासून सुमारे सव्‍वा दोन लाख पौंडांची कमाई केली जाते. या हाडांपासून एक खास प्रकारची दारू बनविली जाते. तिची बाजारात किंमत सुमारे 185 पौंड आहे.

आंतरराष्ट्रीय वन्‍यप्राणी संरक्षण करारावर चीनने वाघांच्‍या संरक्षणासाठी स्‍वाक्षरी केलेली असली तरीही या देशात वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्‍यासह त्यांच्‍या अस्थी आणि कातडीचा व्‍यवसाय सर्रास सुरू आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शिकारीसाठी वाघांची अवैध 'फार्मिंग'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner