स्त्रियांनी फक्त मुलं जन्‍माला घालावीत!

Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

ईश्‍वराने स्त्रियांना केवळ चांगल्‍या वंशाची मुले जन्‍माला घालण्‍यासाठी घडविले असून त्‍यांनी तेवढंच कराव यातच सर्वांचं भलं आहे. जर त्या घर सोडून राजकारणात आल्‍या तर ते चालणार नाही, असे प्रतिपादन शिया धर्मगुरू कल्‍बे जव्‍वाद यांनी केले असून त्‍यांच्‍या या वक्तव्‍यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.

अलाहाबाद येथे आयोजित धर्मगुरूंच्‍या एका संमेलनात जव्‍वाद बोलत होते. त्‍यांच्‍या या वक्तव्‍यामुळे महिलांच्‍या स्‍वातंत्र्यावरून पुन्‍हा नवीन वाद निर्माण झाला आहे.



धर्मगुरूंच्‍या संमेलनात जव्‍वाद म्हणाले, की महिला केवळ मुलं जन्‍माला घालण्‍यासाठी असतात. राजकारण हे त्यांचं काम नाही. त्‍यांनी केवळ आपलं काम करून मुलं घडवावित जर त्या स्‍वतःच राजकारणात येऊ लागल्‍या तर पुढच्‍या पिढीतून चांगले नेते कसे येतील. म्हणून महिलांना राजकारणापासून दूर ठेवलेलंच बरं.

यापूर्वी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठा मदरसा नदवा-उल-उलेमाचे प्रमुख मौलाना सर्रदुर रहमान आजमी नदवी यांनीही अशाच प्रकारचा सल्‍ला देताना मुस्लिम महिलांनी आपल्‍या मर्यादा ओलांडू नयेत असा इशारा दिला होता. घटनेत दुरुस्‍ती करून महिलांना राजकारणात आरक्षण देण्‍याच्‍या विषयावर तर नदवी प्रचंड चिडले. ते म्हणाले, की मुस्लिम महिलांना राजकारण जायचे असल्‍यास त्यांनी सर्वांत आधी आपला पडदा दूर करावा कारण इस्लाममध्‍ये चेह-यावरील पडदा काढून सार्वजनिक ठिकाणांवर भाषण देण्‍याचा महिलांना अधिकार नाही.

नदवी म्हणाले, की इस्लाममध्‍ये महिलांना केवळ घरात राहुन मुलांची आणि घराची देखरेख करण्‍यास सांगितले आहे. त्‍यांना आता शिकण्‍याचा अधिकार देण्‍यात आला असला तरीही त्‍यांनी एक बाब लक्षात घ्‍यावी की सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्‍यास इस्‍लाम परवानगी देत नाही.


मौलवींच्‍या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली आपलं मत नोंदवा.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "स्त्रियांनी फक्त मुलं जन्‍माला घालावीत!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner