मोदींची रविवारी एसआयटीसमोर चौकशी

Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk


अहमदाबाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगल प्रकरणाची चौकशी करीत असलेल्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्‍स बजावले असून या समन्‍सनुसार रविवार, 21 मार्च रोजी मोदी यांना एसआयटी समोर हजर रहावे लागणार आहे. यातून बजावण्‍यासाठी मोदी यांनी प्रयत्न सुरू केले असल्‍याचे काही अधिका-यांचे म्हणणे असले तरीही समन्‍स टाळणे त्यांना शक्य नसल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे.


गुजरातमध्‍ये 2002 मध्‍ये भडकलेल्‍या धार्मिक दंगलीच्‍या चौकशीसाठी विशेष तपास पथाकाची स्‍थापना करण्‍यात आली असून या पथकाने मुख्यमंत्री मोदी यांना चौकशीसाठी 21 मार्च रोजी उपस्थितीचे समन्‍स बजावले आहेत.

अहमदाबादच्‍या गुलबर्ग सोसायटीत जीवंत जाळून टाकण्‍यात आलेले कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्‍या पत्नी जाकिया जाफरी यांच्‍याकडून दाखल एका याचिकेनंतर हे समन्स बजावण्‍यात आले आहेत.

या संदर्भात 'सीट'चे प्रमुख राघवन यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांना समन्‍य पाठविण्‍यात आले असून आतापर्यंत जमा करण्‍यात आलेल्‍या पुराव्यांच्‍या आधारे त्‍यांना काही प्रश्‍न विचारले जाणार आहेत. हे समन केवळ जाफरी यांच्‍या हत्‍या प्रकरणात बजावण्‍यात आल्‍याचेही राघवन यांनी सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मोदींची रविवारी एसआयटीसमोर चौकशी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner