संपूर्ण मुंबई किनारपट्टीची रेकी केलीः हेडली
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
आपण एप्रिल 2008 मध्ये मुंबई समुद्र किना-याच्या चारही बाजूने नावेवरून फेरफटका मारून त्या दरम्यान दहशतवाद्यांना उतरवण्यासाठीची जागा निश्चित केली होती. तसेच ही माहिती आपण एका जीपीएस डिव्हाइसमध्ये सेव्ह केली होती, अशी माहिती पाकिस्तानी वंशाचा दहशतवादी डेव्हीड हेडलीने अमेरिकन न्यायालयासमोर कबुली जबाबात दिली आहे.
न्यायालयात दिलेल्या एका वक्तव्यात हेडलीने सांगितले, की मार्च 2008 मध्ये त्याच्या पाकिस्तानी नेत्यांशी त्याची या ठिकाणांबाबत चर्चा झाली होती. भारतातून माहिती गोळा करून पाकमध्ये परतल्यावर त्याने हल्ल्यासाठी निवडलेल्या ठिकाणांबाबत त्यांना सांगितले होते.
राणाला हल्ल्याबाबत माहिती
हेडलीने दिलेल्या माहितीनुसार शिकागो परतल्यानंतर त्याने गोळा केलेली माहिती मुंबई हल्ल्यातील दुसरा आरोपी तहव्वुर राणाला दिली होती. राणाला आपण लश्करसाठी काम करीत असल्याचीही माहिती होती. तसेच दहशतवादी हॉटेल ताज समोर उतरून हल्ला करतील हे देखिल माहिती होते असे हेडलीने सांगितले आहे.
हेडलीने दिलेल्या माहितीनुसार राणा दहशतवादी कारवायांमध्ये त्याची मदत करीत असे मात्र राणाने आतापर्यंत आपण अशा कारवायांमध्ये कधीही सहभागी नव्हतो असेच पालुपद सुरू ठेवले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "संपूर्ण मुंबई किनारपट्टीची रेकी केलीः हेडली"
Post a Comment