आता बँकांमध्येही मराठीची राज ठाकरेंची मागणी
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बॅंकांनी आपला कारभार मराठीत करावा याकडे मोर्चा वळवला आहे. बॅकांची एटीएम, कॉल सेंटर्स आणि त्यांचे ग्राहकांशी होणारे पत्रव्यवहार मराठीत व्हावेत, असे मनसेने बॅंकांना बजावले आहे.
बॅंकांची ग्राहकांना जाणारी पत्रे बहुतांश वेळा फक्त इंग्रजीतच जातात. पण इंग्रजी येत नसलेल्या मराठी ग्राहकांना ती समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे पत्रव्यवहारात मराठीचाही समावेश करावा अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी बॅंकांनी मराठी तरूणांचीही भरती करावी असेही मनसेचे म्हणणे आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कामकाज हिंदी व इंग्रजीतून चालते. पण त्यात मराठी ही आणखी एक भाषाही समाविष्ट करावी अशी मनसेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी आता सर्वच बॅंकांना एक पत्र पाठविण्यात येणार असून त्यात परदेशी बॅंकांचाही समावेश असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "आता बँकांमध्येही मराठीची राज ठाकरेंची मागणी"
Post a Comment