प्रतापगढ घटनेतील मृतांना मदतीस मायावतींचा नकार

Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk

लखनऊ

प्रतापगढ येथे कृपालु महाराज आश्रमात झालेल्‍या चेंगराचेंगरीच्‍या घटनेतील मृतांच्‍या नातेवाईकांना मदत देण्‍यासाठी राज्‍य सरकारकडे पैसे नसल्‍याचे मुख्यमंत्री मायावती यांनी जाहीर केले असून राज्‍याची आर्थिक स्थिती खराब असल्‍याने आम्ही कुठलीही मदत देऊ शकत नाही. केंद्राने ही मदत द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

राहुल गांधी या घटनेतील मृतांच्‍या कुटुंबीयांचे सांत्वन करण्‍यासाठी प्रतापगढला गेले आणि त्‍यांना शक्य ती सर्व प्रकारची मदत देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यानंतर लगेच मायावतींनी ही घोषणा केली आहे.

मायावती यांनी लगेच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, की आश्रमातील घटनेमुळे मला दुःख झाले आहे. मात्र त्‍यांना आर्थिक मदत देण्‍या इतका राज्‍य सरकारकडे पैसा नसल्‍याने आम्ही मदत करू शकत नाही. केंद्र सरकारने त्‍यासाठी पुढाकार घेऊन मृतांच्‍या नातेवाईकांना आणि जखमींना मदत द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "प्रतापगढ घटनेतील मृतांना मदतीस मायावतींचा नकार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner